साधकांना सूचना

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी राष्ट्र, धर्म, तसेच अध्यात्म यांसारख्या विविध विषयांवर सहस्रो साधकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य हे चिरंतन असे मार्गदर्शक तत्त्व असते. विविध प्रसंगी त्यांनी केलेले मार्गदर्शन समष्टीला, तसेच पुढील पिढ्यांना उपयोगी पडावे, यासाठी आपण त्यांचा संग्रह करून ते नियतकालिके, ग्रंथ, संकेतस्थळ आदींसारख्या विविध माध्यमांतून प्रकाशित करत आहोत.
सनातन संस्थेची स्थापना झाली. त्या काळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक ठिकाणी स्वतः फिरून अध्यात्मप्रसार केला, साधकांचे शंकानिरसन केले आणि साधकांना मार्गदर्शनही केले. त्यातील काही प्रसंगांचे चित्रीकरण करण्यात आले. त्या व्यतिरिक्त अनेक प्रसंगांचे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. त्या वेळी साधकांनी त्यांच्या मार्गदर्शनातील सूत्रे लिहून घेतली होती.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दैनिक, ग्रंथ, ध्वनीचित्रफिती आदींसारख्या विविध माध्यमांतून आजवर प्रकाशित न झालेली मार्गदर्शनपर सूत्रे कुणाकडे संग्रही असल्यास ती समष्टीला उपलब्ध करून देण्यासाठी पुढे दिलेल्या पत्त्यावर लिहून पाठवावीत.
लिखाण पाठवतांना द्विरुक्ती टाळण्याच्या दृष्टीने लक्षात घ्यावयाची सूत्रे
१. सभा, जाहीर प्रवचने आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या सत्संगांतील सूत्रे यांचे चित्रीकरण किंवा ध्वनीमुद्रण करण्यात आलेले आहे. त्यामुळे ती सूत्रे लिहून पाठवू नयेत.
२. जिल्ह्यातील साधकांना एकत्रित मार्गदर्शन केलेले असल्यास शक्य असल्यास त्यातील सूत्रे जिल्ह्यातील एकाच साधकाने संकलित करून पाठवावीत.
३. एखाद्या प्रसंगामध्ये किंवा कार्यक्रमात काही मोजकेच साधक असल्यास त्यांच्यापैकी कुणीतरी एकाने दायित्व घेऊन ती सूत्रे लिहून पाठवावीत.
लिखाण पाठवण्यासाठीचा पत्ता
इ-मेल : [email protected]
टपालाचा पत्ता : श्री. अमोल बधाले, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१