हुमरमळा येथे मद्यासह २ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस पथक मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी हुमरमळा येथे महामार्गाच्या बाजूला एक कंटेनर उभा असल्याचे दिसले. त्या कंटेनरची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचे अडीच ते ३ खोके सापडले.