मक्केमध्ये मांस आणि मद्य यांवर असलेली बंदी चालते; मात्र मथुरेमध्ये चालत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी धर्मांधांचे कान टोचले !

जे लंडनमध्ये वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी वंशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्याला कळते, ते भारतातील मानवाधिकारवाल्यांना का कळत नाही ? –

कसाल येथे मद्यासह ७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात

प्रतिदिन मद्याची अवैध वाहतूक रोखल्याची एकतरी बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होते; पण ही अवैध वाहतूक कायमची रोखण्यासाठी आणि अशी वाहतूक पुन्हा करण्यास कुणी धजावू नये, यासाठी प्रशासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नाही.

भाडेतत्त्वावरील ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्या !

या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

मंत्रालयात आढळल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या !

मंत्रालय कि मद्यालय ? राज्याचे प्रशासकीय कामकाज चालणार्‍या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळणे, हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पदच !

मालगाव (जिल्हा सातारा) येथील २ मद्यसाठ्यांवर पोलिसांच्या धाडी !

मालगाव येथील बसडेपोच्या बाजूला मद्य विक्री करणारे विक्रम राजेंद्र आवळे यांच्यावर कारवाई करत ८४० रुपयांच्या १४ देशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

संभाजीनगर येथे अपघातातील घायाळ कंटेनर चालकाला सोडून नागरिकांनी पळवल्या मद्याच्या पेट्या !

कंटनेरमध्ये एकूण १ सहस्र ८०० मद्याच्या पेट्या होत्या. या वेळी मद्याची पेटी पळवणार्‍या एकाही नागरिकाने कंटेनरच्या घायाळ चालकाकडे लक्ष दिले नाही

सावंतवाडी तालुक्यात ३४ लाख रुपयांच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली

मद्याची अवैध वाहतूक पोलीस कायमस्वरूपी का रोखू शकत नाहीत ?

भंडारदरा (नगर) परिसरात मद्यपी पर्यटकांची पोलीस आणि ग्रामस्थ यांना मारहाण

मद्यबंदी हटवणारे प्रशासन मद्याचे दुष्परिणाम लक्षात घेणार का ? पोलीस मार खातात यातून पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते कि नाही, असा प्रश्न पडतो !

चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवल्यामुळे मद्यविक्रेत्याने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची केली पूजा-आरती !

एका मंत्र्याची पूजाअर्चा करणे आणि तेही त्यांनी मद्यबंदी उठवल्यामुळे हे लज्जास्पद आणि धर्मविरोधी आहे !

संभाजीनगर येथे मद्यधुंदीत २ पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ‘एन्.एस्.जी’च्या सैनिकाला अटक !

सैनिकाने मद्यधुंदीत पोलिसांशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. अशा सैनिकांना तात्काळ बडतर्फ करायला हवे.