वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी १८ सहस्र रुपयांची लाच घेतांना दापोलीतील वैद्यकीय अधिकारी कुराडे यांना पकडले !

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल !

सिन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक !

ही लाच पंचांसमक्ष घेत असतांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.

सिन्नर येथील ५० सहस्रांची लाच स्वीकारतांना कृषी अधिकार्याला पकडले !

कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी उद्योजकाकडून ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना सिन्नर तालुका कृषी अधिकारी आणि निफाड तालुक्याचा अतिरिक्त कारभार पहाणारे अण्णासाहेब गागरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

लाचेविना काम न करणार्‍या कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

७ सहस्र रुपयांची लाच घेतांना वरळी आरे दुग्दुधशाळा विभागाच्या साहाय्यक व्यवस्थापक रणजितसिंग कोमलसिंग राजपूत यांना २० एप्रिल या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

खेडशी (रत्नागिरी) येथील मंडल अधिकार्‍याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !

खेडशी मंडल अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर याला लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने सापळा रचून पकडले.

ग्रामसेवकाला लाच घेतांना पकडले !

या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाल्यावर त्यांनी सापळा रचून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोपीला पकडले.

नगर येथील २ पोलिसांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

४३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता ८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तसेच दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अपंग प्रमाणपत्राकरता लाच घेणार्‍या फिजिओथेरपिस्टच्या विरुद्ध गुन्हा नोंद !

अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्याकरता ६० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’तील फिजिओथेरपिस्ट पवन शिरसाठ यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

सापळा रचून पकडलेल्या लाचखोर सरकारी अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात ‘एसीबी’ला अपयश !

लाच घेतलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लाच घेतांना रंगेहात पकडलेले असते, तसेच त्यांच्याकडून लाचेची रक्कमही जप्त केली जाते. हे सर्व प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले असतांनाही दोषींना शिक्षा का होत नाही ? नक्की यामध्ये काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाडा, देवगड (सिंधुदुर्ग) येथील वीजवितरणचे अधिकारी अमित पाटील यांना लाच घेतांना अटक

भ्रष्टाचार्‍यांवर पहिल्याच वेळी कडक कारवाई न केल्याने त्यांना पुन:पुन्हा भ्रष्टाचार करण्याचे धाडस होते, हे यातून सिद्ध होते. त्यामुळे अशांचे स्थानांतर किंवा निलंबन नाही, त्यांना नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !