मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागातील २ लाचखोर निरीक्षकांसह एक इसम कह्यात

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !

कसाल मंडल अधिकार्‍याला ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

लाच स्वीकारतांना कसालचे मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

भंडारा येथील तहसीलदार निवृत्ती उइके यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

लाच घेणार्‍या गुन्हेगारांवर प्रशासन आणि पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने गुन्हेगार समाजात मनमानी पद्धतीने कारभार करतात. भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले यांना अटक

अटक झाल्यानंतर वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहातात आणि प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत संबंधित शासकीय चाकरीचा लाभ घेत रहातात. त्यामुळे जोपर्यंत तात्काळ निकाल आणि कठोर शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा घालणे हा एक फार्सच ठरत आहे

लाच मागितल्याप्रकरणी ठाणे वाहतूक शाखेचा हवालदार कह्यात

तक्रारदार रिक्शा चालकाच्या रिक्शावर वाहतूक विभागाने केलेली कारवाई रहित करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे हवालदार गोकुळ झाडखडे यांनी सुमित पवार यांच्या वतीने ३०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न!

नागपूर येथे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या प्रकरणी साहाय्यक आयुक्तांना अटक

९ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक त्यांना केली आहे.

नागपूर येथे ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना समाज कल्याण अधिकार्‍याला अटक

भ्रष्ट अधिकार्‍यांना नुसते निलंबित करून चौकशी नको, तर कायमस्वरूपी बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

सीबीआयच्या भ्रष्टाचारी उपअधीक्षकाच्या घरावर सीबीआयच्याच पथकाची धाड

कुंपणच जर शेत खात असेल, तर कुणावर विश्‍वास ठेवायचा ? भ्रष्ट राजकारण्यांच्या संगतीमुळे आता अन्वेषण यंत्रणाही भ्रष्ट झाल्या आहेत !

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ‘रायटर’ महिलेला ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

असे लाचखोर कर्मचारी पोलीस खात्यात असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ? भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

राजस्थानमध्ये दोघा उपदंडाधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

काँग्रेसच्या राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांची लाचखोरी ! याला काँग्रेस सरकारचा पाठिंबा आहे का ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उत्पन्न होतो !