सिन्नर येथील ५० सहस्रांची लाच स्वीकारतांना कृषी अधिकार्याला पकडले !

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या महसूल विभागातील अधिकार्यांना कठोर शिक्षा केल्याविना या घटना थांबणार नाहीत !

नाशिक – कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी उद्योजकाकडून ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना सिन्नर तालुका कृषी अधिकारी आणि निफाड तालुक्याचा अतिरिक्त कारभार पहाणारे अण्णासाहेब गागरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. (भरगच्च वेतन, निवासस्थान, महागाई भत्ता असे सर्व असतांनाही अधिकारी लाच घेतात. त्यामुळे अशा अधिकार्यांची संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. – संपादक)

सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये एका उद्योजकाने उत्पादित केलेली यंत्रे आणि अवजारे यांच्या खरेदीवर शेतकर्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरीत करण्यात येत असते; परंतु या उद्योजकाची यंत्रे अनुदानास पात्र नाहीत, असे गागरे याने भासवले. अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात गागरे यांनी ४ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख रुपयांची लाच घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर या प्रकरणी उद्योजकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.