खेडशी (रत्नागिरी) येथील मंडल अधिकार्‍याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

रत्नागिरी, २० एप्रिल (वार्ता.) – तालुक्यातील खेडशी मंडल अधिकारी अमित जगन्नाथ चिपरीकर (वय ३९ वर्षे) याला ३१ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने १९ एप्रिल या दिवशी सापळा रचून पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिपरीकर याने एका व्यक्तीच्या नावावर असलेल्या सातबारा उतारार्‍यावर दुरुस्ती करण्याकरता १० सहस्र रुपये, तर अन्य एकाने खरेदी केलेल्या भूखंडाच्या सातबारा उतार्‍यावर करण्यात आलेल्या फेरफार नोंदीला संमती देण्याकरता २१ सहस्र रुपये, असे एकूण ३१ सहस्र रुपयांची लाच मागितली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे रत्नागिरी पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण आणि अन्य पोलीस कर्मचारी सहभागी असलेल्या पथकाने केली.