नाशिक येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍याला लाच घेतांना अटक !

‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.

भिवंडी येथील लाचखोर नायब तहसीलदार कह्यात !

भिवंडी येथील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.

शाहिदा युनुस काझी या महिला मंडल अधिकार्‍याला २० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना रंगेहात पकडले !

भ्रष्‍टाचारामध्‍ये धर्मांध महिलाही पुढे असणे देशासाठी धोकादायक !

छत्रपती संभाजीनगर येथे बढती मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसाने घेतली लाच !

अशा भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना बढती मिळतेच कशी ? वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचार्‍यांच्या कामांचा आढावा घेत नाहीत का ? अटक केलेल्या दोन्ही भ्रष्ट फौजदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

जालना येथे धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी अटक !

२३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

लाचखोर सतीश खरे याने १०० कोटींची अवैध मालमत्ता जमवल्‍याचा आरोप !

शिंदे-फडणवीस सरकारच्‍या काळात भ्रष्‍ट अधिकार्‍यांना रंगेहात पकडण्‍याची मालिकाच चालू आहे. ५ लाखांपासून ते ३० लाख रुपयांची लाच घेण्‍यापर्यंत अधिकार्‍यांची मजल गेली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत.

लाच घेतल्‍याप्रकरणी विटा (जिल्‍हा सांगली) नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी विनायक औंधकर कह्यात !

बांधकामाचा परवाना देण्‍यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना मुख्‍याधिकारी विनायक औंधकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या जाळ्‍यात सापडले. केवळ ३ मासांपूर्वी त्‍यांचे विटा नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी स्‍थानांतर झाले होते.

नाशिक येथील जिल्हा उपनिबंधकांना ३० लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

सर्व शासकीय सुविधा आणि पुष्कळ वेतन असतांनाही जिल्हा उपनिबंधकासारख्या अधिकार्‍यांनी लाच घेणे लज्जास्पद !
प्रशासनाने अशा अधिकार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !

सातारा जिल्हा न्यायालयात लाच घेतांना अधिवक्त्याला अटक !

जिल्हा न्यायालयातील अधिवक्ता विलास बाळकृष्ण कुलकर्णी यांना तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपये लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक येथे वीज अभियंता ४० सहस्रांची लाच घेतांना अटक !

घोटी आणि वैतरणा भागातील एका उद्योजकाला वीज मीटरवर वाढीव भार संमत करून देण्‍याच्‍या मोबदल्‍यात ४० सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारणारे वीज वितरण आस्‍थापनाचे साहाय्‍यक अभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली.