सिन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक !

नाशिक, २३ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी (वर्ग १) यांनी तक्रारदाराकडून सिन्नर नगरपालिकेत सादर केलेल्या रो हाऊस बांधकाम अनुमतीच्या धारिकेला मान्यता देण्याच्या मोबदल्यात १ युनिट म्हणजे एका रो हाऊसचे १ सहस्र रुपये याप्रमाणे ५ रो हाऊसचे एकूण ५ सहस्र रुपये इतकी लाच मागितली. (कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – संपादक) ही लाच पंचांसमक्ष घेत असतांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली.