श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिक्कबळ्ळापूर, कर्नाटक येथील कु. धृति एच्.पी. (वय १३ वर्षे) !
धृतीच्या परीक्षेच्या दुसर्या दिवशी महाशिवरात्र होती. तिने अभ्यासाचे नियोजन करून ग्रंथप्रदर्शनाच्या कक्षावर सेवा केली. तिला हस्तकलेची आवड आहे. त्याचा उपयोग ती सेवेसाठी करते. एकदा मंदिर अधिवेशनात तिने उपायांसाठी खोके (बॉक्स) उत्कृष्ट रितीने सिद्ध केले होते.