गुरुबोध

प्रा. गुरुनाथ मुंगळे

१ . ‘जग’ आणि ‘जग’ या शब्दांत केवळ उच्चाराचा भेद आहे. जग जिंकणे म्हणजे काय ?

अलेक्झांडरने जग जिंकले, म्हणजे केवळ दगड-मातीवर सत्ता प्रस्थापित केली; पण ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.

२. प्रश्‍न संपत नाहीत; कारण देह हे एक मोठे प्रश्‍नचिन्‍ह आहे. कसे, केव्‍हा, का आणि कुठे (How, When, Why and Where) या शब्‍दांवर माणूस कर्म चालवत असतो. त्‍यामुळे विचार स्‍वस्‍थ, म्‍हणजेच आत्‍मलीन होत नाहीत. अंतःकरणास स्‍थैर्य प्राप्‍त होत नाही. संघर्ष संपुष्‍टात येत नाही. अतृप्‍ती ही सदैव मनुष्‍याच्‍या ठिकाणी असते. संतांच्‍या ठिकाणी सदैव आनंद असतो; कारण आनंद नक्‍की कुठे असतो, हे त्‍यांना ठाऊक असते.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)