पुणे येथे हत्येचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक !

शरद मोहोळ यांच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न करणारे संदेश कडू आणि शरद मालपोटे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुलांसह ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पुणे येथे अल्पवयीन मुलावर अत्याचार करणार्‍या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी !

न्याय मिळवण्यासाठी २ वर्षे वाट पहावी लागल्यामुळे पीडित मुलाला झालेला मनस्ताप कसा भरून येणार ? न्याय लवकर मिळण्यासाठी यामध्ये कोणती सुधारणा करू शकतो, हे न्यायपालिका पाहील का ?

‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ लागू करून बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला !

गेले काही महिने बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे, घरे, दुकाने आदी नष्ट केली जात आहेत आणि हिंदूंच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात टाकण्यात येत आहे.

सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती !

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे पुणे जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामाची पहाणी !

राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंत्री महाजन यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन कामाची पहाणी केली.

वाकड (पिंपरी) येथे पानाच्या दुकानामध्ये गांजा विक्री करणार्‍यास अटक !

पिंपरी, पुणे येथे पान दुकानामध्ये (टपरी) गांजा विक्री करणार्‍या पुनीत कुमार या पानटपरी चालकाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पुनीत कुमारकडून ५ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणार्‍या शिक्षकाला अटक

वर्गात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणार्‍या ३८ वर्षीय शारीरिक शिक्षण विषय शिकवणार्‍या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी धावण्याचा सराव करत असताना आरोपी शिक्षकाने वर्गाचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

वर्ष २०२४ मध्ये कल्याण-डोंबिवली येथे ३ सहस्र ४४ गुन्हे उघड !

वर्ष २०२४ मध्ये येथे ३ सहस्र ४४ गुन्हे उघड झाले आहेत. त्यात बलात्कार, विनयभंग, चोरी, अपहरण, घरफोड्या, खून अशा गुन्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

‘महावितरण अभय योजना २०२४’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ !

देयकाच्या थकबाकीमुळे वीजयंत्रणा कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी चालू केलेल्या ‘महावितरण अभय योजना २०२४’ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Russian Citizen Caught In Maha Kumbh : महाकुंभक्षेत्री पाच विदेशी नागरिकांची चौकशी

पोलीस स्थानिक नागरिकांसह विदेशी नागरिकांवरही लक्ष ठेवून आहेत.