Temple Vandalized In Sagar (MP) : सागर (मध्यप्रदेश) येथील मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

२ हिंदु घायाळ

सागर (मध्यप्रदेश) – येथील बडा बाजारात ४ जानेवारीच्या दुपारी कापडाने चेहरा झाकलेल्या काही व्यक्तींनी मंदिराची तोडफोड केली. या वेळी मंदिराच्या रक्षणासाठी पुढे आलेल्यांवर त्यांनी आक्रमण केले. यात अनुज जडिया आणि बाबू जडिया हे दोघे घायाळ झाले. मंदिराच्या तोडफोडीची माहिती मिळताच येथे तणाव निर्माण झाला. लोकांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हिंदूंनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. सध्या मंदिराजवळ बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घायाळ झालेले बाबू जडिया यांनी आरोप केलो की, पारस मंदिराजवळ आमचे कुलदैवताचे मंदिर आहे. दुपारी २० ते २५ जण मंदिराचे मुख्य दार बंद करून आत तोडफोड करत होते. आम्ही त्यांना विरोध केल्यावर त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि पळून गेले.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांनाही तेथे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !