Kolkata Kali Mata Procession Violence : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे श्री महाकालीदेवीच्या मिरवणुकीवर गोळीबार : एक जण घायाळ

मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील सरबंगपूरमध्ये श्री महाकालीदेवीच्या मिरवणुकीच्या वेळी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यात एक जण घायाळ झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा गोळीबार धावत्या बसमधून करण्यात आला. स्थानिक लोकांनी ही बस रोखली आणि नियंत्रणात घेतली. त्यांनी येथे रस्ताबंद आंदोलन चालू केले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस तेथे पोचले.

मुर्शिदाबादमध्ये मुसलमानाच्या घरात बाँबस्फोट

मुर्शिदाबाद येथील रामकृष्ण पल्ली भागातील एका मुसलमानाच्या घरात झालेल्या बाँबस्फोटात फरीद शेख नावाची व्यक्ती घायाळ झाली. भाजपचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी फरीद शेख तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याचा दावा केला. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

ज्या घटना बांगलादेशात घडतात त्याच घटना बंगालमध्ये घडत आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद ! बंगालमधील हिंदू आणखी किती वर्षे तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसवणार आहेत ?