देवीच्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी बसल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या गळ्यातील श्रीयंत्र एका दिव्य प्रकाशाने उजळले असल्याचे दिसणे
कर्नाटक राज्यातील ‘अहोबिलम्’ येथे लक्ष्मी-नरसिंह मंदिराच्या जवळच देवीचेही देऊळ आहे. मी काही वेळ देवीसमोर प्रार्थना करण्यासाठी बसले. मी प्रार्थना करत असतांना काढलेल्या छायाचित्रात माझ्या गळ्यात असलेल्या श्रीयंत्रातून, म्हणजेच देवीयंत्रातून प्रकाश बाहेर पडतांना प्रत्यक्ष दिसते.