४.२.२०२१ या दिवशी भगवान नरसिंहाचे ‘स्वाती’ नक्षत्र असल्याने आम्ही ‘अहोबिलम्’ येथे गेल्यानंतर लक्ष्मी-नरसिंहाच्या देवळात रामराज्याच्या स्थापनेसाठी नरसिंह याग केला. येथील मुख्य पुजारी रमेशगुरुजीआजोबा यांनी हा याग छान केला. ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला पाहिल्यावर ‘मी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीलाच पहात आहे’, असे मला वाटले.’’ याचे मलाही पुष्कळ आश्चर्य वाटले. देव कुणाकुणाला अनुभूती देतो. देवाची लीला अगम्य आहे. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (४.२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |