बारामती (जिल्हा पुणे) – येथील वर्दळीच्या ठिकाणी असणार्या कृष्ण पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मयूर शिंदे यांना भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवत लुटण्याचा प्रकार घडला. मयूर शिंदे हे पेट्रोल पंपावरील रक्कम अधिकोषात भरण्यासाठी दुचाकीवरून जात असतांना त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. पैशांची पिशवी हाती येत नसल्याचे लक्षात येताच त्यांना चोरांनी काही अंतरावर फरपटत नेले. तरीही शिंदे यांनी आपली चिकाटी सोडली नाही. या घटनेत ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बारामतीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे; मात्र त्यांनी केलेल्या निकराच्या प्रतिकारामुळे दोघा चोरांनी रक्कम न घेताच तेथून पळ काढला.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित बारामती ! |