सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी १९ ऑगस्टपर्यंत सातारा जिल्ह्यात शस्त्र आणि जमाव बंदी आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ चे कलम ३७ (१)(३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश देण्यात आले असल्याचे सातारा जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.