मणीपूर हिंसाचारावरून सरन्‍यायाधिशांवर टीका करणार्‍या लेखकाला तमिळनाडू पोलिसांकडून अटक !

अटकेचा भाजपकडून निषेध !

श्री. बद्री शेषाद्री

पेरंबलूर (तमिळनाडू) – येथील पोलिसांनी राजकीय विश्‍लेषक आणि लेखक बद्री शेषाद्री यांना ‘यू ट्युब’ वाहिनीवरील एका मुलाखतीमध्‍ये मणीपूरमधील हिंसाचारावरून  सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांच्‍यावर टीका केल्‍याच्‍या आरोपावरून अटक केली. मुलाखतीमध्‍ये शेषाद्री म्‍हणाले होते, ‘सर्वोच्‍च न्‍यायालयाने सांगितले आहे, ‘जर तुम्‍ही (सरकार) काही करू शकत नाही, तर आम्‍ही (सर्वोच्‍च न्‍यायालय) करू.’ सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांना बंदूक द्या आणि तिकडे पाठवा. तेव्‍हा बघू ते किती शांतता निर्माण करू शकतात.’

भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्‍यक्ष अण्‍णामलाई यांनी शेषाद्री यांच्‍या अटकेचा निषेध केला आहे. त्‍यांनी ट्‍वीट करून म्‍हटले की, सत्ताधारी द्रविड मुन्‍नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सूड उगवण्‍याचे धोरण राबवण्‍याचे दायित्‍व पोलिसांचे आहे का ?