सातारा, ३० जुलै (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सातारा येथील न्यायालयातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे अन् तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश स.र. सालकुटे या २ न्यायाधिशांचे स्थानांतर करण्यात आले. काही मासांपूर्वी ‘सातारा बार कौन्सिल’ने यांच्यावर बहिष्कार टाकला होता. याविषयीची माहिती ‘सातारा बार कौन्सिल’ने मुंबई उच्च न्यायालयालाही दिली होती. याविषयी मुंबई उच्च न्यायालयाकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. ही समिती २ दिवसांपासून सातारा येथे आहे. या प्रकरणाचा अहवाल मुंबई येथील वरिष्ठांकडे जाताच मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश मंगला धोटे यांची पदावनतीने पुणे येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून स्थानांतर केले आहे, तसेच न्यायाधीश स.र. सालकुटे यांचे नागपूर येथे स्थानांतर केले आहे.