पुणे – खासगी टेंपोतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबई येथे पहाटे गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार गोमांसाची वाहतूक करणार्या टेंपोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ८ टन गोमांसासह २७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. टेंपोत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कांदे-बटाट्याच्या गोणी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी गोरक्षक स्वामी यांनी देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे. टेंपोचालक दीपक रफिक पैगंबर आणि टेंपोमालक शौकत हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गोरक्षकांनी गोमांस किंवा गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्यांना पकडून दिल्यावर केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करण्यात येते; मात्र गोहत्येचे सूत्रधार मोकाट रहातात. – संपादक) उस्मानाबाद (धाराशिव) येथून मुंबईला हे गोमांस घेऊन जात असल्याची माहिती पोलीस अन्वेषणात पुढे आली आहे. (गोवंशियांच्या हत्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनियंत्रित पद्धतीने चालूच आहे. भारतात असलेल्या देशी गोवंशियांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची, तसेच गोमांसाची तस्करी चालू आहे. हे लक्षात घेऊन केंद्रशासनाने केंद्र स्तरावरच याविषयी प्रभावी कायदा करावा आणि त्याची कार्यवाही राज्यांना बंधनकारक करणे अपेक्षित ! – संपादक)