सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले म्हणजे चैतन्याचे मूर्तीमंत रूप ! त्यांच्यातील चैतन्याची अनुभूती संत, साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमीच नव्हेत, तर निर्जीव वस्तूही घेतात ! सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चैतन्यमय पदस्पर्शाने त्यांच्या खोलीतील लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत आणि लाद्यांच्या गुळगुळीतपणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.
असे आहे, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चैतन्यमय मार्गदर्शनानुसार साधना करणार्या साधकांमध्ये पालट होणार नाहीत का ? निश्चितच होतील; किंबहुना होतच आहेत, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक प्रगती होतच आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने आतापर्यंत (२५ मार्च २०२३ पर्यंत) सनातनचे १०८७ साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत आणि १२३ साधक संत झाले आहेत ! यासाठी साधकांनो, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शिकवणीवर पूर्ण श्रद्धा ठेवून तळमळीने आणि निष्कामभावाने साधना करतच रहा !’
– पू. संदीप आळशी (१४.३.२०२३)