श्रीरामभक्त लक्ष्मणाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात भारतात दळणवळण बंदी असतांना दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रसारित झाल्या होत्या. या भीषण आपत्काळातही प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अन् त्यांच्या भक्तांच्या चरित्रातील प्रसंग आणि त्यांच्या लीला पाहून अनेकांना मन:शांती लाभली अन् कोरोनाला सामोरे जाण्याचे आध्यात्मिक बळही मिळाले. त्यामुळे हिंदु धर्मातील ग्रंथांमध्ये अध्यात्मशास्त्र असल्यामुळे ते कधीच कालबाह्य होत नाहीत.

३१.३.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात https://sanatanprabhat.org/marathi/668312.html

आपण ‘लक्ष्मण’ या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ, तसेच लक्ष्मणाच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

२. श्रीरामभक्त लक्ष्मणाची विविध गुणवैशिष्ट्ये  

२ ई. परम योगी आणि तपस्वी वृत्ती : लक्ष्मणाचे जीवन एखाद्या योग्याप्रमाणे होते. त्याने १४ वर्षांच्या वनवासात कधीच अन्न-जल प्राशन केले नाही. तो केवळ वायू भक्षण करून जगत होता. ज्याप्रमाणे योगी अविश्रांत तपस्या करत असतात, त्याप्रमाणे लक्ष्मणाने १४ वर्षे सतत जागृत स्थितीत राहून झोप न घेता श्रीरामाची सेवा केली. त्यामुळे लक्ष्मणाला ऋषीमुनींप्रमाणे तपसामर्थ्य प्राप्त झाले होते. लक्ष्मणाच्या तपोबळाचे सामर्थ्य एवढे होते की, देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि नाग हे त्याच्या अधीन होते. ब्रह्मदेवाने इंद्रजिताला असे वरदान दिले होते की, ‘ज्याने १४ वर्षे अन्न-पाणी ग्रहण केले नसेल आणि जो १४ वर्षांत एक क्षणही झोपला नसेल’, अशा योगीपुरुषाकडून तुझा वध होईल. ही सर्व गुणवैशिष्ट्ये लक्ष्मणाकडे असल्यामुळे त्याने त्याच्याकडील योग्याचे तेज, बळ आणि सामर्थ्य यांच्या बळावर श्रीराम अन् रावण यांच्या महायुद्धात अजेय असणार्‍या इंद्रजिताचा पराभव करून त्याचा नाश करून पृथ्वीचा भार हलका केला.

२ उ. लक्ष्मणाने कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग या चारही योगमार्गांनुसार साधना करणे : रामभक्त लक्ष्मणामध्ये अनेक दैवी गुणांचा समुच्चय होता. व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर लक्ष्मणाने सर्व कर्तव्ये पूर्ण करून आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श सेवक या सर्वांची कर्तव्ये पूर्ण करून सर्वांपुढे आदर्श भक्ताचे उदाहरण ठेवले आहे.

२ उ १. लक्ष्मणाने विविध योगमार्गांनुसार केलेल्या साधनेचे प्रमाण (टक्के)

३. रामभक्त लक्ष्मणातील विविध गुणांचे प्रमाण (टक्के)

परम रामभक्त लक्ष्मणामध्ये असंख्य गुणांचा समुच्चय होता. या दैवी गुणांमुळे त्याचे जीवनही दैवी स्वरूपाचे होते.

टीप – सर्वसामान्य व्यक्तीचा अहं ३० टक्के असतो. संतांचा अहं १० टक्के किंवा त्याहून अल्प असतो. अहं ० टक्के झाल्यावर व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते.

४. प्रभु श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

टीप १ – भरतामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ४० टक्के इतके असल्यामुळे त्याच्यामध्ये रामराज्य चालवण्याची दैवी क्षमता होती. त्यामुळे जेव्हा प्रभु श्रीराम १४ वर्षे वनवास भोगत होते, तेव्हा भरताने सिंहासनावर प्रभु श्रीरामाच्या पादुकांची स्थापना करून १४ वर्षे रामराज्य केले. लक्ष्मणामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ५० टक्के होते. त्यामुळे तो रामाबरोबर वनवासात रहात होता.

रामराज्य चालवण्यापेक्षा वनवास भोगणे अधिक कठीण होते. त्यामुळे वनवास भोगण्याचे कार्य लक्ष्मणाने केले. यावरून लक्ष्मणाची साधना, सेवावृत्ती आणि त्याग हे दैवी गुण प्रकर्षाने दिसून येतात.

टीप २ – लक्ष्मणाचा स्वभाव थोडा तापट असणे, उदा. सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा श्रीराम शिवधनुष्य तोडतो, तेव्हा मिथिलेत भगवान परशुराम प्रगट होतात आणि शिवधनुष्य तोडल्याबद्दल ते श्रीरामाला खडे बोल सुनावू लागतात.

तेव्हा  लक्ष्मणाला क्रोध अनावर होऊन तो भगवान परशुरामाला प्रत्युत्तर देऊ लागतो. जेव्हा श्रीराम लक्ष्मणाला समजावतो, तेव्हा त्याचा क्रोध शांत होतो. त्यानंतर श्रीराम भगवान परशुरामाची क्षमा मागतो. तेव्हा भगवान परशुरामही शांत होतात.

कृतज्ञता !

‘देवाच्या असीम कृपेमुळे परम रामभक्त लक्ष्मणावर वरील लिखाण उत्स्फूर्तपणे सुचले. भगवंतानेच माझ्या मनातील विचार शब्दबद्ध करून घेतले. हा लेख करत असतांना संगणकावर जसे लक्ष्मणाच्या संदर्भातील शब्द उमटत होते, तसे त्या शब्दांतून भावाच्या शीतल लहरी वातावरणात तरळून त्यांचा शीतल आणि आल्हाददायक स्पर्श माझ्या हृदयाला होऊन माझा देह आणि मन रामभक्तीत रंगून राममय झाल्याची अनुभूती आली. ‘लक्ष्मणाची थोरवी गाण्यासाठी शब्दच थिटे पडतात’, असे जाणवले. ‘या महान रामभक्तांच्या भूमीमध्ये देवाच्या कृपेने आमचा जन्म झाला’, यासाठी प्रभु श्रीरामाच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२३)

(समाप्त)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.