जालना येथे देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे !

जालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना येथे जात असतांना बदनापूर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी बसस्थानक परिसरात काळे झेंडे दाखवले. या वेळी ‘फडणवीस परत जावा’, अशा घोषणाही देण्यात आल्या. डोंगरगाव येथील मराठा आंदोलक विष्णु घनघावने यांनी ही घोषणा दिली. बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना बाजूला घेऊन वाहनांच्या ताफ्याला जागा करून दिल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जालना येथे गेला. ३० डिसेंबर या दिवशी जालना ते मुंबई या मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’द्वारे झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. खबरदारी म्हणून मराठा आंदोलक काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतील; म्हणून बुटेगाव येथील सरपंच दत्ता गवारे यांना कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.