सातारा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगार आणि त्यांचे वारस यांच्या पात्रता निश्चितीसाठी २ जानेवारी या दिवशी येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी १० वाजता मेळाव्यास प्रारंभ होईल, अशी माहिती मेळाव्याचे आयोजक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला येतांना गिरणी कामगार आणि त्यांचे वारस यांनी आवश्यक कागदपत्रे आणावीत.’’