सोलापूर जिल्ह्याच्या ८५५.२८ कोटी रुपयांच्या वार्षिक योजना आराखड्यास संमती !

सोलापूर – जिल्ह्याच्या वर्ष २०२४-२५ च्या प्रारूप विकास आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. यात सर्वसाधारण खर्च ५८९ कोटी रुपये, अनुसूचित जाती-जमाती उपाययोजना १५१ कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेसाठी ४ कोटी २८ लाख रुपये निधी, तसेच अन्य १११ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी प्रस्तावित केली आहे, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याची सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनामधील असमानता अन् जलदगतीने वाढणार्‍या शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची आवश्यकता, या गोष्टी विचारात घेऊन सोलापूर जिल्ह्याचा विकास आराखडा सिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.