नाशिक येथील सप्तशृंगी मातेच्या मूळ मूर्तीऐवजी चांदीच्या उत्सवमूर्तीवरच अभिषेक !

येथील श्री भगवतीदेवी सप्तशृंगी मातेचे स्वरूप (मूर्ती) संवर्धन आणि देखभाल प्रक्रियेच्या काळात मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर प्रतिदिन होणार्‍या पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात सामग्री वापरण्यासाठीचे पालट करण्यात आले आहेत.

बांगलादेशी घुसखोरांना घर भाड्याने देणार्‍यांवर कारवाई होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गेल्या १० दिवसांत गोव्यात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या एकूण ३२ बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेण्यात आले असून गेल्या ३ वर्षांतील ही संख्या ४१ आहे. यांपैकी ६ जणांना आतापर्यंत बांगलादेशात परत पाठवण्यात आले असून इतरांनाही पाठवले जाणार आहे.

‘मॉल’मध्ये मद्यविक्रीला अण्णा हजारे यांचा विरोध !

‘मॉल’मध्ये मद्यविक्रीला ठेवणे, ही भारतीय संस्कृती नसून विदेशी संस्कृती आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी होतात हे योग्य नाही. आमच्यापर्यंत याविषयी अजून काही आलेले नाही. आताचे सरकार ‘मॉल’मध्ये मद्यविक्रीचा विचार करणार नाही आणि जर तसे झाले तर पुन्हा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल…

श्री तुळजाभवानी मंदिरात दुपारी १२ वाजता होणार विधीवत् घटस्थापना !

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव १७ सप्टेंबर या दिवशी देवीच्या मंचकी निद्रेपासून चालू झाला आहे. २६ सप्टेंबर या दिवशी पहाटे आणि सकाळी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, तसेच दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार आहे.

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांवर गुन्हा नोंद करा !

राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण गुन्हे नोंद करा, असे निर्देश दिले असतांनाही पुणे पोलीस अजूनही गंभीरपणे घेत नाहीत. ‘आम्ही अजूनही त्याची चौकशी करत आहोत. चलचित्र पडताळून पहात आहोत, अन्वेषण चालू आहे’, अशी पुणे पोलिसांची भूमिका आहे.

सकल हिंदु समाजाच्या वतीने पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात महाआरती !

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेच्या मागणीसाठी सहस्रो हिंदुत्वनिष्ठ एकवटले

‘पुरुषोत्तम’ उत्तमच हवा !

समोर काहीतरी आव्हान, अवघड प्रश्न असले, तरच विद्यार्थी घडणार ना ? शिकणार ना ? अशा स्थितीत चांगले नाटक नसल्याने पुरुषोत्तम करंडक नाकारून परीक्षकांनी चांगला आणि योग्य पायंडा पाडला आहे. यातून विद्यार्थी अंतर्मुख होऊन अधिक जोमाने प्रयत्न करतील, ही अपेक्षा !

मंदिराच्या परिसरात भीक मागणार्‍या १८ बालकांना बालसुधारगृहात पाठवले !

येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरात भीक मागणार्‍या १८ बालकांना ‘बाल संरक्षण समिती’च्या पथकाने कारवाई करत कह्यात घेतले. बालकांमध्ये १५ मुले आणि ३ मुली यांचा समावेश आहे.

अशांनाही कारागृहात डांबा !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणे हा त्यांचा विरोध करण्याचा एक प्रकार आहे, असे विधान राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केले.