‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांवर गुन्हा नोंद करा !

पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

पुणे – राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण गुन्हे नोंद करा, असे निर्देश दिले असतांनाही पुणे पोलीस अजूनही गंभीरपणे घेत नाहीत. ‘आम्ही अजूनही त्याची चौकशी करत आहोत. चलचित्र पडताळून पहात आहोत, अन्वेषण चालू आहे’, अशी पुणे पोलिसांची भूमिका आहे. त्या विरोधात येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिवक्ता प्रदीप गावडे यांच्या वतीने बंडगार्डन पोलिसांना निवेदन, तसेच लेखी तक्रार दिली आहे. पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्यावर अतिशय किरकोळ गुन्हे नोंद करून त्यांना सोडून दिले आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसांना हे निवेदन दिल्याचे सांगितले.

पुणे पोलिसांनी दिरंगाई टाळावी आणि पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे कार्यकर्त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?