मंदिराच्या परिसरात भीक मागणार्‍या १८ बालकांना बालसुधारगृहात पाठवले !

प्रतिकात्मक छायाचित्र

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरात भीक मागणार्‍या १८ बालकांना ‘बाल संरक्षण समिती’च्या पथकाने कारवाई करत कह्यात घेतले. बालकांमध्ये १५ मुले आणि ३ मुली यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आई-वडिलांची ओळख पटेपर्यंत मुलांना बालसुधार गृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बाल संरक्षण समिती’ने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणार्‍या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘बाल संरक्षण समिती’ने २३ सप्टेंबर या दिवशी ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

मुलांना भीक मागायला लागू नये, असे वाटत असेल, तर त्यांना शिक्षण, तसेच त्यांचे प्रारब्ध पालटणारे धर्मशिक्षण द्या !