लंपी आजारापासून पशूधन वाचवण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पशूधन ही आपली संपत्ती असून तिची जपणूक करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात लंपी त्वचारोगाने पशूंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ सप्टेंबर या दिवशी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिले.

श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीची स्वच्छता !

या वेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि इतर असे ४०० सभासद, एन्.सी.सी. मधील १ सहस्र ५०० मुले-मुली अन् अधिकारी, असे एकूण अनुमाने २ सहस्र सभासद सहभागी झाले होते.

पुणे येथे वर्ष २०१९ च्या तुलनेत श्री गणेशमूर्ती लाखाने घटल्या !

यंदाच्या वर्षी उत्सवावरील कोरोनाचे निर्बंध हटवल्याने, तसेच महापालिकेत समाविष्ट २३ गावांमधील गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपती यांमुळे मूर्तींची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी पन्हाळगड येथील ‘लंडन बस’ या नावाची पाटी हटवली !

भारत स्वतंत्र झाला, तरी वैचारिकदृष्ट्या आपण पारतंत्र्यातच आहोत, हे दर्शवणारी ही घटना आहे ! इंग्रजी नावाची पाटी आहे, हे लक्षात येऊन ते काढण्यासाठीचा पाठपुरावा करणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे अभिनंदन !

कब्रस्तानच्या विश्वस्तांनी आतंकवादी मेमनची कबर त्याच्या नातेवाइकांना विकल्याचा रहिवाशांचा आरोप !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील दोषी आतंकवादी याकूब मेमन याची कबर कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीब यांनी याकूब मेमन याचे नातेवाईक रऊफ मेमन यांना विकली असल्याचा आरोप येथील रहिवासी शाहिद शेख यांनी केला आहे.

मुंबईतील टॅक्सीचालकांची भाडेवाढीसाठी बेमुदत संपाची चेतावणी !

भाडेवाढीच्या संदर्भात टॅक्सीचालक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाल्या; मात्र याविषयी सरकारने निर्णय न घेतल्याने अखेर टॅक्सीचालक संघटनांनी संपाचा निर्णय घेतला आहे

‘मठ-मंदिर स्वच्छता उपक्रमा’च्या अंतर्गत विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडून इचलकरंजी (कोल्हापूर) येथे पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता !

या उपक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महाजनगुरुजी, सर्वश्री राजकरण शर्मा, आनंदा मकोटे, सुजीत कांबळे, सोमेश्वर वाघमोडे, अमोल शिरगुप्पे, संजय माने, सुरेश शिंदे, राजू सवाईराम, मुकेश चोथे, नरेंद्र-पंडित आण्णा यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील बेपत्ता मुलीचे प्रकरण पोलीस आयुक्तांनी दाबण्याचा प्रयत्न केला !

रवि राणा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मी शेतकर्‍यांसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात मला दिवाळीच्या ३ दिवस आधी अटक करण्यात आली होती.

खारघर येथे शाळेच्या बसला आग !

आग लागण्यापूर्वीच चालकाने सर्व विद्यार्थ्यांना बसमधून उतरवल्याने सुदैवाने या आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.

नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे नवीन धोरण निश्चित !

१५ वर्षांपूर्वीच्या जुन्या धोरणांमध्ये पालट करून पूर, भूस्खलन, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याविषयीचे राज्यशासनाने नवीन धोरण निश्चित केले आहे. १२ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.