मुंबईतील टॅक्सीचालकांची भाडेवाढीसाठी बेमुदत संपाची चेतावणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – टॅक्सीचे किमान प्रवासी भाडे १० रुपयांनी वाढवावे या मागणीसाठी शहरातील टॅक्सीचालक संघटनांनी १५ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याची चेतावणी दिली आहे. मुंबईत सध्या टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे. या संपाला मुंबईतील रिक्शाचालकांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

भाडेवाढीच्या संदर्भात टॅक्सीचालक संघटना आणि सरकार यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाल्या; मात्र याविषयी सरकारने निर्णय न घेतल्याने अखेर टॅक्सीचालक संघटनांनी संपाचा निर्णय घेतला आहे. टॅक्सीचालक संघटनेचे शिष्टमंडळ १३ सप्टेंबर या दिवशी अधिकार्‍यांची भेट घेणार आहे. या भेटीत भाडेवाढीचा निर्णय न झाल्यास संप करणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.