ग्रंथमालिका : मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धकर्म

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

नवरात्रोत्सवानिमित्त प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

साधकांनो, आपल्या गुरूंनी दिलेले ज्ञान अमूल्य असल्याने संपर्क करतांना न्यूनगंड बाळगू नका !

सनातन संस्थेशी समाजातील सर्व स्तरांतील व्यक्ती सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य लक्षात घेऊन आणि त्यानुसार कृती केल्याने त्यांना आलेल्या अनुभूतींमुळे सनातनकडे आकृष्ट होत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध ऑगस्ट २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला आतापर्यंत एकूण ११ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजे ‘श्राद्ध’. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते.

पितृपक्षात सर्वांनी दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व !   

हल्लीच्या काळात जवळजवळ सर्वांनाच पूर्वजांचा त्रास होत असल्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रत्येकानेच दररोज १ ते २ घंटे करणे आवश्यक आहे. पूर्वजांचा त्रास न्यून होण्यासाठी पितृपक्षात श्राद्धविधी करतात. त्यासमवेतच दत्ताचा नामजप केल्यास…

अमेरिकेत नोकरीसाठी असतांना झालेल्या प्रसंगांचे चिंतन केल्यावर साधिकेला लक्षात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !

सुश्री (कु.) सुप्रिया गजेंद्र टोणपे या नोकरीनिमित्त ७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला होत्या. तेथील रज-तम प्रधान वातावरणातही त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू ठेवली. केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळेच त्या हे करू शकल्या, असा त्यांचा भाव आहे.

तिसर्‍या महायुद्धाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सक्षम होणे आणि स्वतःचे रक्षण होणे यांसाठी तीव्र तळमळीने साधना करा !

समाज, साधक आणि संत यांनी एक क्षणही वाया न घालवता प्रत्येकाने स्वतःची साधना वाढवावी.

दत्ताच्या नामजपाने आलेल्या काही अनुभूती

‘मला स्वप्नात अगदी रोज साप दिसायचे, भीती वाटायची, कधी कधी दचकून जाग यायची. सनातन संस्थेच्या साधिका कु. माधवी आचार्य यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला.