संत आसाराम बापू यांची कारागृहातून त्वरित सुटका करावी !

सोलापूर येथे श्री योग वेदांत समितीची ‘मूक मोर्चा’द्वारे मागणी

संत आसाराम बापू

सोलापूर – संत आसाराम बापू हे मागील ९ वर्षांपासून कारागृहात आहेत. अद्यापही त्यांची सुटका झालेली नाही. त्यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी करत ३० ऑगस्ट या अन्याय दिवसाच्या विरोधात सोलापूर येथे श्री योग वेदांत सेवा समिती, युवा सेवा संघ, महिला उत्थान मंडळ, संस्कृती रक्षक संघ, तसेच भारत जागृती मोर्चा या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

संत आसाराम बापू यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्काचे हनन होत आहे. त्यांचे वय, प्रकृती आणि सामाजिक कार्य यांचा विचार करून तत्परतेने त्यांना जामिन किंवा पॅरोल, तसेच आवश्यक स्वास्थ्य उपचार उपलब्ध करून दिले जावेत. जोधपूर उच्च न्यायालयात त्यांच्या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा, अशीही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.