सोलापूर, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – येथील प्रशासकीय कार्यालयात काही ठिकाणी वातानुकूलित यंत्रांमधून पाणी खाली सांडणे, काही ठिकाणी पाणी साचून रहाणे, यंत्रातील पाणी तेथील भिंतीवर पडून भिंत खराब होणे, तसेच शहर अभियंता यांसारख्या अन्य महत्त्वाचे विभाग असलेल्या इमारतीत बहुतांश सर्वच जिन्यांमध्ये पान-तंबाखू यांच्या पिचकार्या मारलेल्या आहेत. जिन्यांमध्ये मारलेल्या पिचकर्यांमुळे तेथून वर जाणार्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. यामुळे ‘स्वच्छ भारत मिशन’च्या अंतर्गत ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून मिरवणार्या सोलापूर महापालिकेची ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आहे.
वातानुकूलित यंत्रांमधून पाणी खाली सांडून तेथे साचून तळे निर्माण झाल्याने तेथून येणार्या-जाणार्या विशेषत: वयोवृद्ध पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देऊन महानगरपालिकेच्या प्रशासनाने ही स्थिती लवकरात लवकर सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.