‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथील शाळेत ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन

या वेळी ‘शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या जीवनाला अध्यात्माची जोड दिली, तर ते नेहमीसाठी आनंदी राहू शकतात’, असे मार्गदर्शन प्रतिष्ठानचे श्री. गुलशन किंगर यांनी केले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचे आदेश !

महामार्गावर अनेकांचे जीव गेल्यावर जागे होणारे प्रशासन काय कामाचे ? आतापर्यंत झालेल्या अपघातांच्या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला, तर रस्ते अपघातात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात कुणीही हयगय करणार नाही !

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘तिरंगा ऑनलाईन छायाचित्र संग्रहा’ची ‘गिनीज बूक’मध्ये नोंद !

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘‘हा विश्वविक्रम करत अमृत महोत्सवी वर्षात अमृताचा वर्षाव झाला आहे. कोणत्याही देशात त्यांच्या देशातील युवकांची प्रेरणा हीच देशाची शक्ती असते.

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी आवाज उठवणार ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यातील अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप साहाय्य प्राप्त झालेले नाही. याविषयी आम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ७५ सहस्र रुपये घोषित करावेत, अशी आमची मागणी आहे. याविषयी विधीमंडळात आवाज उठवू, असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.

विधानसभेच्या अधिवेशनासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून पक्षादेश !

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून शिंदेगटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयात खटला चालू आहे. असे असले तरी यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी भरतशेठ गोगावले यांना शिवसेनेचे पक्षप्रतोद म्हणून मान्यता दिली आहे.

पुणे येथील साधना सत्संगातील महिला जिज्ञासूच्या पुढाकारामुळे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू झाला !

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या कार्यक्रमात झालेली स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. ऋतुजा दासी यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतःच्या इमारतीत स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली होती.

हिंदूंना विरोध करण्याच्या एकमेव कारणातून मुसलमान समाज आणि मुसलमान समाजातील काही नेते ‘वन्दे मातरम्’ला विरोध करत आहेत ! – हिंदू महासंघ

आनंद दवे पुढे म्हणाले की, हिंदू महासंघ म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की, त्यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हटल्याने त्यांची काहीही हानी होत नाही. त्यांच्या भावनासुद्धा दुखावल्या जात नाहीत.

जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत विविध उपक्रमांचे आयोजन !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी (जळगाव) येथे भारतमातेच्या चित्राचे पूजन करणे, क्रांतीकारकांच्या कार्याचे ‘फ्लेक्स’ प्रदर्शन लावणे, संपूर्ण ‘वंदे मातरम्’ म्हणणे आणि सामूहिक ध्वजवंदन आदी उपक्रम राबवण्यात आले.

भरूच (गुजरात) येथील कारखान्यावरील धाडीत ५१३ किलो अमली पदार्थ जप्त !

मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; एका महिलेसह ७ आरोपींना अटक, संबंधितांना कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ यंत्रणेचे जाळे उद्ध्वस्त होऊ शकेल !

रूपी बँकेसंदर्भातील धोरण रिझर्व्ह बँकेने पालटणे आवश्यक ! – अजित पवार

रिझर्व्ह बँकेने रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित करण्याचा आदेश काढला; पण पुण्यातील ५ ते ६ बँका अडचणीत आहेत. या बँका विलीन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.