गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेली स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून प्रेरणा मिळाली !
पुणे – गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या कार्यक्रमात झालेली स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. ऋतुजा दासी यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वतःच्या इमारतीत स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली होती. त्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतः पुढाकार घेऊन इमारतीतील काही युवतींना प्रशिक्षणाविषयी जागृत केले, तसेच त्यांची एकत्रित बैठक घेऊन सनातन संस्थेच्या वतीने ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’, या विषयावर शौर्यजागृतीपर मार्गदर्शन केले. त्यामुळे १४ ऑगस्टपासून सातारा रस्ता येथे प्रत्येक रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत वर्ग चालू झाला.