पुणे – रिझर्व्ह बँकेने रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित करण्याचा आदेश काढला; पण पुण्यातील ५ ते ६ बँका अडचणीत आहेत. या बँका विलीन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मग सहकारी बँकांच्या बाबतीत हा दुजाभाव का ? जे अधिकारी, संचालक आणि कर्जदार यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; मात्र रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित करणे चुकीचे आहे. रूपी बँकेसंदर्भातील धोरण रिझर्व्ह बँकेने पालटणे आवश्यक आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे दौर्यावर असतांना पत्रकारांशी बोलतांना सांगितले.