नवी मुंबई महापालिकेचा ४ सहस्र ९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संमत

नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्ष २०२२-२३ साठी ४ सहस्र ९१० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर करून संमत केला. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही.

मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंत्रालयाबाहेर महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन !

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांसह शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते.

येत्या २-३ दिवसांत अंमलबजावणी संचालनालयाकडून आणखी कारवाया होतील ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

२४ फेब्रुवारी या दिवशी नवाब मलिक यांच्या अटकेच्या समर्थनार्थ दादर येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ‘ड्रग्ज पेडलिंग’ आणि देशविरोधी कारवाया यांच्याशी संबंध ! –  मोहित कंबोज, भाजप नेते

मलिक यांनी टाडाच्या कलमाखाली गुन्हे नोंद असणार्‍या आरोपीकडून मालमत्ता खरेदी केली. त्यांनी संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेतली; मात्र पदाचा दुरुपयोग केला.

‘ईडी’ची नवाब मलिक यांच्यावरील कारवाई चुकीची नाही, आरोप खोटे असतील तर सिद्ध करा ! – चित्रा वाघ, प्रवक्त्या, भाजप

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारलेल्या मैदानाला ‘झाशीच्या राणी’चे नाव देण्याची शिवसेनेची मागणी

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या मैदानासाठी विकासनिधी देऊन क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाची कमान उभारली होती. काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह भाजपकडून त्याला विरोध करण्यात आला होता.

‘वान्लेस नर्सिंग कॉलेज’ येथे हिंदु महिला आणि विद्यार्थिनी यांना मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडणार्‍यांना निलंबित करा ! – भाजपचे प्रांत कार्यालयात निवेदन

ख्रिस्ती शिक्षण संस्थांचे धर्मांतराचे अप्रत्यक्ष प्रयत्न ! त्यांच्याकडून कशाप्रकारे हिंदु विद्यार्थिनींना धर्मपालन करण्यापासून रोखले जाते याचेच, हे उदाहरण आहे. अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर विभागीय चौकशी चालू असतांनाही अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार !

सहसंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आयुक्तपदाचा अथवा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये त्यामुळे कामावर नियंत्रण रहात नाही, असा संकेत आहे; मात्र सुपे यांची नियुक्ती करतांना हा संकेत पाळला गेलेला नाही.

उद्योजक प्रवीण राऊत यांच्या निकटवर्तियांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड !

उद्योजक प्रवीण राऊत यांच्या ठाणे आणि रायगड येथील निकटवर्तियांच्या मालमत्तेवर २३ फेब्रुवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली आहे.