मुंबई – नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयाच्या बाहेरील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांसह शिवसेनेचे काही नेते उपस्थित होते. या आंदोलनात शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित नसल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता शिवसेनेचे काही नेते उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला गेले असल्याचे शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आंदोलन रात्री उशिरा ठरल्यामुळे येता आले नसल्याचे सांगितले.