मुंबई – नवाब मलिक यांच्या खटल्यामध्ये देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांची नावे घोषित केली आहेत. त्यांतील अनेकांवर लवकरच कारवाई होईल. येत्या २-३ दिवसांत अंमलबजावणी संचालनालयाकडून आणखी कारवाया होतील, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
२४ फेब्रुवारी या दिवशी नवाब मलिक यांच्या अटकेच्या समर्थनार्थ दादर येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली.