गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि पंजाब या ५ राज्यांत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट ! – संपादक 

 

१. गोव्यातील उमेदवारांच्या विरोधात विविध स्वरूपांचे गुन्हे प्रविष्ट

‘अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे, विनयभंग करणे, महिलेवर अत्याचार करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, भ्रष्टाचार करणे, चोरी करणे, धमकी देणे, पोलीस ठाण्यावर आक्रमण करणे, मारहाण करणे, फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान करणे, रस्त्यावरील वाहतूक अडवणे, दुसर्‍याचा जीव धोक्यात घालणे, अनधिकृतपणे जमाव जमवणे, जुगार खेळणे, रेल्वे वाहतूक अडवणे, धनादेश न वटणे, अनधिकृतपणे आंदोलन करणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये उमेदवारांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट झालेले आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात खटलेही चालू आहेत.’

२. गोव्यातील उमेदवारांमध्ये शिक्षा झालेले २ उमेदवार !

‘दोन उमेदवारांना पोलीस कोठडीही ठोठावण्यात आलेली आहे. यातील एका उमेदवाराला मारहाण केल्याच्या प्रकरणी ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दुसर्‍या उमेदवाराला धनादेश न वटवल्याच्या प्रकरणी ३ मासांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.’


‘निवडून आल्यावर पक्षांतर करणार नाही’, अशी उमेदवारांना शपथ घ्यावी लागते, हे लज्जास्पद !

‘निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही’, अशी शपथ काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीच्या सर्व ४० उमेदवारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घेतली.’