स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्‍या युवकाला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकले  !

समाधान महादेव मोरे

सातारा, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील लोणार गल्लीत स्पर्धा परीक्षेची सिद्धता करणार्‍या समाधान महादेव मोरे या युवकाला काही मद्यपी युवकांनी मारहाण करून चुन्याच्या निवळीत ढकलून दिले. यामुळे समाधान यांचे सर्वांग भाजून निघाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याविषयी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून मारहाण करून चुन्याच्या निवळीत ढकलून देणार्‍यांना अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

धायगुडे अकॅडमीतील ७-८ विद्यार्थी समाधान मोरे यांच्यासह लोणार गल्लीत वास्तव्यास आहेत. तेथे नितीन सोडमिसे नावाचा युवक त्याच्या मित्रांसह आला. त्याने मद्यप्राशन केले होते. सोडमिसे आणि त्याचे सहकारी यांनी मोरे यांना मारहाण करत चुन्याच्या निवळीत ढकलून दिले.