१३ फेब्रुवारीला मिरज येथे कृष्णा-वेणी उत्सव सोहळा आणि कृष्णा नदीची महाआरती !

कृष्णा नदी

मिरज, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही १३ फेब्रुवारीला मिरज येथे कृष्णा-वेणी उत्सव सोहळा आणि कृष्णा नदीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम सकाळी ९ वाजता ब्राह्मणपुरी येथील श्री अंबाबाई मंदिर येथून श्री दत्त मंदिर, कृष्णा घाट, श्री मार्कडेंश्वर मंदिर अशी पालखी काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १०.३० वाजता श्री कृष्णा वेणी मूर्ती प्रतिष्ठापना होईल. सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० या वेळेत ओटी भरणे आणि दर्शन सोहळा होईल. सायंकाळी भव्य दीपोत्सव आणि महाआरती होईल. हे सर्व कार्यक्रम कोरोना संसर्गाचे नियम पाळून होणार असून अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक श्री. ओंकार शुक्ल यांनी केले आहे.