सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती घरी आणल्यानंतर सौ. वर्षा ठकार यांनी घरातील चैतन्यात वाढ झाल्याचे अनुभवणे

सनातन-निर्मित शाडू मातीची श्री गणेशमूर्ती

१. सनातन-निर्मित शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणल्यापासून घरातील वातावरण चैतन्यमय आणि आनंदी वाटणे

‘या वर्षी सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती दळणवळण बंदीमुळे घरपोच येणार होती; म्हणून मी प्रथमच सनातनची शाडूच्या मातीची मूर्ती घरी आणली. मूर्ती घरी आणल्यापासून घरातील चैतन्यात वाढ होऊन वातावरण आनंदी झाले होते आणि पूजा करतांना माझी भावजागृती होत होती.

२. सकाळी निर्माल्य काढल्यावर आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर वाहिलेली बेलाची पाने टवटवीत आणि ताजी दिसणे अन् या पानांवर पांढरे शुभ्र दैवी कण दिसणे

सौ. वर्षा ठकार

१.९.२०२० या दिवशी अनंत चतुर्दशी होती. तेव्हा सकाळी गणपतीची पूजा करण्यास गेले असता निर्माल्य काढतांना लक्षात आले की, गणपतीच्या मूर्तीवर वाहिलेली बेलाची पाने टवटवीत आणि ताजी दिसत होती. इतर देवतांवर वाहिलेली बेलाची पाने सुकलेली होती. तसेच या पानांवर पांढरे शुभ्र दैवी कण होते.

३. बेलाच्या पानांच्या माध्यमातून देवाने अनुभूती देऊन मला आशीर्वाद दिल्यासारखा वाटणे

माझी १० दिवस गणपतीला प्रार्थना होत होती, ‘देवा, जातांना माझ्या साधनेतील प्रगतीसाठी मला आशीर्वाद देऊन जा.’ बेलाच्या पानांच्या माध्यमातून देवाने अनुभूती देऊन खरेच मला आशीर्वाद दिल्यासारखा वाटत आहे. मी अनेक वर्षे घरी गणपति बसवते; पण अशी अनुभूती मला प्रथमच आली. यासाठी श्री गणेश आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. वर्षा ठकार, पुणे (ऑक्टोबर २०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक