सोलापूर येथील चि. श्लोक केशव हाके याच्याविषयी त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भधारणा झाल्यावर
अ. ‘बाळ गर्भात असतांना माझी प्रतिदिन पहाटे ३ वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्याची उपासना (स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि पोथीचे वाचन करणे) होत होती. गजर न लावताही पहाटेच्या उपासनेसाठी मला नियमितपणे जाग येत होती. त्या वेळी माझ्या मनात ‘मला भगवंताची सर्वाेत्कृष्ट दासी व्हायचे आहे’, असा विचार सतत असे. असे म्हणतात की, ‘भगवंताचे दास बोटावर मोजण्याइतकेच असतात. त्यांपैकी मी एक असावे’, असे मला सतत वाटत होते.
आ. गर्भावस्थेत असतांना मला कोणताही त्रास झाला नाही. या कालावधीत मी सतत दत्तगुरूंचे नामस्मरण करत होते.
२. प्रसुती
२ अ. प्रसुतीच्या वेळी त्रास होणे आणि देवानेच त्यातून सोडवणे : मला प्रसुतीच्या वेळी पुष्कळ त्रास झाला; पण त्या वेळी माझे सतत नामस्मरण चालू होते. मी देवाचा धावा करत होते. ‘देवा, यातून तूच मला सोडव’, असे देवाला सतत आळवत होते. देवानेच मी आणि बाळ यांना त्या यातनांमधून सोडवले. देवाने मला पुष्कळ साहाय्य केले.’
– सौ. गायत्री केशव हाके (चि. श्लोकची आई), महाळूंग, सोलापूर.
२ आ. वहिनींची प्रसुती निर्विघ्नपणे होण्यासाठी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि मारुतिराया यांना प्रार्थना करणे अन् त्यांच्या कृपेने प्रसुती निर्विघ्नपणे झाल्याचे जाणवणे : ‘माझ्या वहिनींच्या प्रसुतीच्या वेळी ‘प्रसुतीला वेळ लागत आहे आणि त्यांना त्रासही होत आहे’, असे मला कळवण्यात आले होते. तेव्हा मी वहिनींची प्रसुती निर्विघ्नपणे होण्यासाठी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सौ. बिंदाताई) आणि मारुतिराया यांना प्रार्थना केली. त्या वेळी मी वहिनी आणि गर्भातील बाळ यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करून देवाला आळवत होतो. त्या वेळी मी मारुतिराया वहिनींची दृष्ट काढत आहेत, असे मानसरित्या समजून प्रार्थना केली. त्यानंतर थोड्याच वेळात बाळंतपण सुखरूपपणे होऊन बाळाचा जन्म झाल्याचे मला समजले. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि मारुतिराया यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्यांनीच सूक्ष्मातून वहिनींचे बाळंतपण सुखरूपपणे केल्याचे मला जाणवले.’
– श्री. सचिन हाके (चि. श्लोकचे काका), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
३. प्रसूतीनंतर
अ. ‘श्लोक जन्मल्यानंतर लगेचच रडला नाही. तो जवळजवळ १५ मिनिटांनी रडला. तेव्हाही तो केवळ एक ते दीड मिनिटेच रडला आणि लगेच शांत झाला. आताही तो पुष्कळ रडत नाही.
आ. त्याने जन्मल्यापासून ‘दिवसा अथवा रात्रीच्या वेळी रडणे’, अशा प्रकारचा त्रास कधीच दिला नाही. तो जन्मल्यापासून आतापर्यंत केवळ भूक लागल्यावरच रडतो.’
– सौ. गायत्री हाके
इ. ‘बाळाच्या जन्मानंतर त्याच्याकडे पाहिल्यावर हे बालक सात्त्विक असल्याचे मला जाणवले. तेव्हा त्याच्याकडे पाहून पुष्कळ शांत वाटले. ‘बाळ उच्च लोकातून जन्माला आले आहे’, असे मला जाणवले. – श्री. सचिन हाके (चि. श्लोकचे काका)
४. ३ ते ९ मास
अ. ‘श्लोक ४ मासांचा (महिन्यांचा) असल्यापासून ‘अंगठा आणि तर्जनी जुळवून मुद्रा करून झोपत असल्याने तो झोपेत नामस्मरण करत आहे’, असे मला जाणवते. त्याच्याकडे पाहिल्यावर कामाचा सर्व ताण निघून जातो आणि उत्साह जाणवतो.
आ. तो ६ – ७ मासांचा असल्यापासूनच घरामध्ये आरती चालू झाली की, तो लगेच शांत होतो. तो ८ मासांचा (महिन्यांचा) असतांना श्री गणेशचतुर्थीच्या काळात घरामध्ये खेळत होता. सायंकाळच्या वेळी आरती चालू झाली. तेव्हा तो लगेचच शांत झाला आणि त्याने आरतीकडे एकाग्रतेने लक्ष दिले. आरती झाल्यानंतर तो पुन्हा खेळू लागला.’
– सौ. गायत्री हाके
५. मोहक हास्य
अ. ‘आमच्याकडे गावातील बरेच लोक ये – जा करत असतात. तेव्हा श्लोक बाहेर अंगणामध्ये खेळत असल्यास तो येणार्या जाणार्या लोकांकडे पाहून हसतो. तेव्हा गावातील लोकांनाही त्याच्या मोहक हास्यामुळे त्याच्याकडे पाहून पुष्कळ आनंद होतो.
आ. गावातील काही जणांनी आम्हाला सांगितले, ‘‘आम्ही कोणत्या विचारात असलो किंवा आम्हाला काही कारणास्तव राग आला असेल आणि तेव्हा श्लोककडे पाहिले, तर पुष्कळ चांगले वाटते. आमचा राग नाहीसा होतो आणि आमच्या मनातील विचार न्यून होतात.’’
– श्रीमती प्रमिला हाके (चि. श्लोकची आजी)
६. देवाप्रती ओढ
अ. ‘श्लोक ८ मासांचा असल्यापासून खेळतांना त्याच्या समोर ‘विठ्ठल, विठ्ठल’, असे म्हटल्यावर तो लगेच टाळ्या वाजवतो. त्याला टाळ्या वाजवतांना पुष्कळ आनंद होतो.
आ. माझ्या भ्रमणभाषमध्ये ‘नाम तुझे घेता देवा, होई समाधान ।’ ही ‘रिंगटोन’आहे. मला कुणाचा भ्रमणभाष आल्यावर त्या गीताच्या स्वराने तो खेळता खेळताही एकदम शांत होतो आणि ती ऐकत रहातो.’
– श्रीमती प्रमिला हाके
इ. ‘श्लोक ११ मासांचा (महिन्यांचा) झाल्यापासून श्रीकृष्णासमोर नतमस्तक होतो आणि मागे वळून माझ्याकडे पाहून हसतो. तो बाळकृष्णाची मूर्ती मागून घेऊन ती बराच वेळ हातात धरून ठेवतो. त्यानंतर तो ‘बाळकृष्णाच्या मूर्तीशी काहीतरी संवाद साधत आहे’, असे मला वाटते.
ई. त्याला ‘देवबाप्पाला नमस्कार कर’, असे सांगितल्यावर, तो लगेचच करतो. तो प्रत्येकच कृतीला चांगला प्रतिसाद देतो.’
उ. मी त्याला घेऊन शेजार्यांकडे नेले असता, देवतांच्या मूर्ती अथवा चित्रे दिसल्यावर तो देवतांच्या प्रतिमा पाहून टाळ्या वाजवतो आणि मलाही त्यांच्याकडे पहायला सांगतो.
७. चि. श्लोकचे दोष : राग येणे
– सौ. गायत्री केशव हाके, महाळूंग (हाके वस्ती), ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर. (८.६.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |