तत्परतेने धावत येतो भक्तांच्या हाकेला श्रीहरि ।

सौ. विमल कदवाने

तत्परतेने धावत येतो भक्तांच्या हाकेला श्रीहरि ।
गुरुरूप घेऊन तो सर्व भक्तांना तारी ॥ १ ॥

न समजे हे सर्वांना जरी, कसे भक्तांसंगे रहातो श्रीहरि ।
गोड गुपित हे भक्तांनाच दावतो श्रीहरि ॥ २ ॥

जावे लागते शरणागतीने त्याच्या द्वारी ।
श्रद्धा, भक्ती, भाव आणि कृतज्ञता यांनी लाभतो श्रीहरि ॥ ३ ॥

आपल्या अंतरीच्या दोषांचा कचरा काढून बाहेरी ।
नम्रतेच्या साहाय्याने अहंकारावर मात करावी ॥ ४ ॥

कितीतरी जन्मांपासून अडकलो या मायाबाजारी ।
भावनेमुळे अडकून पडलो जन्म-मरणाच्या फेरी ॥ ५ ॥

करूया आता सवारी गुरुकृपेच्या रथावरी ।
गुरुकृपेनेच तरून जाऊ भवसागरी, भेटेल गुरुरूपधारी श्रीहरि ॥ ६ ॥

– सौ. विमल विलास कदवाने, बुरहानपूर (ब्रह्मपूर), मध्यप्रदेश. (३.४.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक