वळपे, पेडणे येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा आज जत्रोत्सव !

आज पेडणे तालुक्यातील वळपे येथे पौष शुक्ल पक्ष अष्टमी, कलियुग वर्ष ५१२२ या दिवशी श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा जत्रोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने भक्तांच्या हाकेला धावून येणार्‍या या देवतांची माहिती पाहूया.

गांजाचा अंश असणार्‍या औषधांद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवता येतील ! – कॅनडातील संशोधकांचा दावा

कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठाने गांजाचा वापर करून कोरोनाचा सर्वाधिक धोका असणार्‍या वयोगटातील आणि गंभीर आजार असणार्‍यांना वाचवता येऊ शकते, असा दावा केला आहे.

मालवण येथे वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी पर्यटन व्यावसायिकांचे आंदोलन

कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह आंदोलन चालू केले आहे.

‘सरफरोश २’ हा चित्रपट ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना समर्पित ! – चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन

‘सरफरोश २’ चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेविषयी आहे. विविध समस्या असतांनादेखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती भक्कम आहे, हे यातून दाखवले जाईल. या समस्या झेलणार्‍या ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना हा चित्रपट समर्पित करत आहे.

चित्रपटांतून प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का करण्यात येते ? – मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे रक्षण करावे, असे हिंदूंना वाटते !

मारहाण प्रकरणी रमेश तवडकर निर्दोष

भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांना वर्ष २०१७ मधील मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे.

योजनाबद्ध पद्धतीने हिंदु धर्माला अवमानित करण्याचे काम केले जात आहे ! – कलाकार राजू श्रीवास्तव

हिंदु धर्माचा वारंवार होणारा अवमान थांबण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे!

मी ४ ते ५ दिवसांत बरा होऊन घरी जाईन ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

माझे आरोग्य आता सुधारत आहे.मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

‘गोवा लोकायुक्तां’च्या नियुक्तीस उच्च न्यायालयाकडून आणखी २ मासांचा अवधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘गोवा लोकायुक्तां’चे रिक्त पद भरण्यासाठी गोवा शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.