
मुंबई – कांदिवलीतील चारकोप येथील साईबाबा मंदिरात २७ डिसेंबरला पहाटे ३ वाजता ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर घायाळ झाले आहेत. सुभाष खोडे आणि युवराज पवार अशी मृतांची नावे आहेत.
हे तिघे जणही मंदिरात झोपले होते. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना लगेच बाहेर पडता आले नाही. अग्नीशमनदलाला आगीची माहिती मिळताच पहाटे सवाचार वाजता अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी पोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घायाळ युवकाचे नाव मनू गुप्ता असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा