प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पाहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

‘समर्थांचे महानिर्वाण’ पुस्तकाचे प्रकाशन

या पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या अखेरच्या काळातील काही आठवणी, दृष्टांत आणि समाधी सोहळा यांचा वृत्तांत असलेल्या कै. सुरेश सातपुते लिखित ‘समर्थांचे महानिर्वाण’ या पुस्तकाच्या द्वितिय आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.

कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव

पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी (२१.१२.२०२०) या दिवशी साजरा होत आहे. याविषयीची उपलब्ध माहिती येथे देत आहोत.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाचे आदर्श कार्य !

संस्थानच्या वतीने बाबांची पुण्यतिथी, जयंती, गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या स्वरुपात साजरे केले जातात.

देवीपूजनाचे शास्त्र !

देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत.