‘समर्थांचे महानिर्वाण’ पुस्तकाचे प्रकाशन

या पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या अखेरच्या काळातील काही आठवणी, दृष्टांत आणि समाधी सोहळा यांचा वृत्तांत असलेल्या कै. सुरेश सातपुते लिखित ‘समर्थांचे महानिर्वाण’ या पुस्तकाच्या द्वितिय आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाविषयी परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य  परशुराम दिनकर कामत यांनी मनोगत लिहिले आहे. या मनोगतात ते म्हणतात, ‘बाबांनी महानिर्वाणापूर्वी अनेक भक्तांना दृष्टांत दिले होते. महात्म्यांचे दृष्टांत महानच असतात. बाबांच्या महानिर्वाणाची इतंभूत कथा या पुस्तकात लेखकाने दिली आहे. हे पुस्तक वाचतांना वाचकाला एक क्षण असा भास होतो की, जणू आपण या महानिर्वाणाच्या क्षणी तेथे होतो. या पुस्तकाची पहिली आणि आताची दुसरी आवृत्तीसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केले, त्या सर्वांचे संस्थांनच्या वतीने मी आभार व्यक्त करतो.’